सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील रमेश प्रभाकर बोबडे हे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नवीन वाघदरा येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 1992-93 या वर्षांपासून स्काऊट गाईड चळवळीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर पचमढी येथे अवघड प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले शिक्षक ठरले.
या प्रशिक्षणाला प्रत्येक राज्यातील शिक्षक सहभागी होते. या अगोदर स्काऊटचे अनेक प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यांच्या शाळेतील व आजपर्यंत स्काऊट क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर 50 च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यस्तरावर ७०च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
उत्कृष्ट ट्रेनर म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. त्यांनी पीप प्रकल्प, प्रौढ शिक्षण, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार, तंबाखूमुक्त शाळा, निरंतर शिक्षण यामध्ये उल्लेखनीय कार्य केले. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला. 5 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार त्यांना मिळाला.
त्याचप्रमाणे स्काऊट विभागांमध्ये उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना तत्कालीन राज्यपाल विद्यासागर यांच्या हस्ते आदर्श स्काऊट म्हणून मुंबई येथे सत्कार झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सन 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबाटो अमेरिका येथे दीडशे देशातील विद्यार्थ्यांना 27 दिवस उपस्थित राहून एडवेंचर ट्रेनर म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यामुळे वणी तालुका तसेच यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे.
जिल्ह्यातील सर्व स्काऊट कार्यालयाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील तालुका कब मास्टर, स्काऊट मास्टर, गजानन गायकवाड जिल्हा संघटक, मनीषा तराळे जिल्हा संघटिका यांनी अभिनंदन केले. वणी तालुक्यातील सर्व क्लब मास्टर, ब्लॉक लीडर यांनी अभिनंदन केले. गुजलवार, काटकर, केंद्रप्रमुख आणि सर्व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.
रमेश बोबडे राष्ट्रीय स्तरावरील लीडर ट्रेनर स्काऊट एल टी ही परीक्षा उत्तीर्ण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 22, 2025
Rating: