सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : 100 दिवशीय टीबी मुक्त अभियानांतर्गत हिवरा येथे दि. 20 मार्च गुरुवारला निक्षय शिबिर संपन्न झाले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी देठे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिवरा येथील सरपंच आरतीताई विशाल गाडगे, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील राजेंद्र गाडगे, ग्रामविकास अधिकारी मून, विठ्ठल ठावरी, मुख्याध्यापक इंगोले, जि. प.शिक्षक परचाके, क्षय रोग टेक्निशियन कपिल रामटेके, श्रीमती वानखेडे, आरोग्य सहाय्यक आर. डी.रिंगणे, आरोग्य सेविका श्रुती गलाट, सामुदायिक आरोग्य अधिकारी पराग नगराळे, पल्लवी मडावी, लॅब असिस्टंट जीवन तिरणकर, आरोग्य सेवक प्रशिक बोरकर, अखिल वेलादे, शंकर आत्राम, उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण आणावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टीबी मुक्त अभियान जे राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत 210 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. सोबतच बी पी, सीबीसी, शुगर व सिकलसेल ची तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन आर डी रिंगणे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आरोग्य सेविका श्रुती गलाट यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आशा सेविका सौ मंगला एकरे, कमल दरवेकर, सरिता जीवतोडे, वंदना ढोके,शुभांगी बावणे,गटप्रवर्तक वैशाली खीरटकर, सुहासिनी भगत, व तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे सहकार्य लाभले.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस,प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,आशा सेविका, तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हिवरा येथे निक्षय शिबिर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 22, 2025
Rating: