गणेशपूरात फुलली अंजिराची फळबाग, उत्पन्नात मोठी वाढ!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी : झरी (जामणी) तालुक्यातील गणेशपुर (खुर्द) येथे माळरानात चंद्रकांत दशरथ घुगुल यांनी वैशिष्ट्यपूर्ण व मौल्यवान असलेल्या अंजीर फळांची बाग फुलवून उत्पादन घेणे सुरू केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 

झरी जामणी तालुक्यातील चंद्रकांत घुगूल राहणार पांढरकवडा (लहान) हे शिवेसेनेचे अनेक वर्षापासून तालुका प्रमुख असून राजकिय सामजिक क्षेत्रात त्यांची चांगली ओळख आहे. तसेच त्यांची पत्नी सुद्धा झरी जामणी पंचायत समितीच्या सदस्य होत्या. त्यांचा सातत्याने तोट्यात चालत असलेल्या शेती व्यवसायाला त्यांनी आधुनिक पद्धतीची जोड साधत शेती व्यवसायाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आणि यातूनच त्यांनी अंजिराची फळबाग फुलवली आहे. आपल्या जमिनीत अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते असा विश्वास मणी बाळगून त्यांनी चापली पवनसुत नर्सरी राजु तुरणकर यांचे मार्गदर्शनात उच्चप्रतिच्या पुणेरी जातीचे रोपे आणून सन 2022 मध्ये जवळपास 300 झाडांची लागवड त्यांनी दिड एकरात केली. मागील वर्षी 1 क्विंटल चे उत्पादन घेतले तर, आतापर्यंत दिड क्विंटल अंजीराची विक्री करण्यात आली असून यंदा एकूण तीस क्विंटलच्या वर दोनशे रुपये प्रतिकिलो प्रमाणे म्हणजे जवळपास 6 लाखाच्या वर विक्रमी उत्पन्न होणार असल्याचे शेतकरी चंद्रकांत घुगूल यांनी सांगीतले. संपूर्णतः ऑरगॅनिक पद्धतीने हे उत्पादन सुरू आहे. याकरिता त्यांनी 46 हजार रुपये किमतीचा गोबर गॅस प्रकल्प शेतात उभारला आहे. त्यातून येणारी शेणाची स्लारी पूर्ण झाडांना देण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. 

अंजीर हे वैशिष्टपूर्ण फळ आहे. इतर फळापेक्षा ते मौल्यवान मानले जाते. कारण ते पित्तविरोधी आणि रक्तशुद्धीरोधक असून भारत, अमेरिका आणि आफ्रिका यासह अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचे फळ ताजे आणि सुकलेले अशा दोन्ही प्रकारचे असते. अंजीर पिकल्यावर त्याचा मुरांब्बा बनवून उपयोगात आणला जातो. मात्र, ज्या ठिकाणी हवामान समशीतोष्ण आणि कोरडे असते,अशाच भागात अंजीरची लागवड केली जाते.असं तज्ज्ञ सांगतात.

भारतात तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात याची लागवड केली जाते. चार-पाच वर्षांच्या वनस्पतीतून सुमारे 15 किलो फळे मिळतात. पूर्णपणे परीपक्व झालेला अंजीर एका वेळी 12000 रुपयांपर्यंत कमावून देतो. 

महाराष्ट्रात अशाप्रकारे लागवड

व्यावसायिकदृष्ट्या अंजीरची लागवड केवळ महाराष्ट्रातच केली जाते. महाराष्ट्रात एकूण 417 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाते, त्यापैकी 312 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेर-शिवरा ते जेजुरी या 10-12 गावांचे क्षेत्र महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा एक प्रमुख भाग आहे. अलीकडे सोलापूर-धाराशिव (उस्मानाबाद) मधील शेतक-यांनी अंजीरांची लागवड सुरू केली आहे. चंद्रकांत घुगूल यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम झरी जामणी तालुक्यात सुद्धा अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.

कोणत्या हंगामात अंजीर घेता येते

अंजीर उष्ण आणि कोरडे अशा हवामान चांगले सहन करतात. यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या भागात हे फळ पिकविण्याच्या दृष्टीने वाव आहे. कमी तापमान या पिकाला हानिकारक नाही. पण दमट हवामान नक्कीच धोकादायक ठरु शकते. विशेषत: कमी पर्जन्यमान असलेल्या भागात अंजीर पिकवता येतात, जेथे ऑक्टोबर ते मार्च या काळात पाण्याची उपलब्धता कमी असते.

अंजीर लागवडीसाठी जमीन कशी असावी

माध्यम काळ्या आणि लाल मातीतील अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत फळबागांमधून अंजीराचे उत्पादन घेता येतात. मोठ्या प्रमाणात चुनखडीसह खारट, काळ्या मातीत अंजीर उत्तम वाढते. अंजीरांसाठी चांगले ड्रेनेज असलेली मीटर खोल माती चांगली असते. तथापि या मातीत चुन्याचे प्रमाण असले पाहिजे. या फळझाडासाठी खूप काळी माती अयोग्य आहे. झाड उथळ आणि चांगल्या ड्रेनेज मातीत पाहिजे तसे वाढत नाही.

कोणत्या आहेत प्रगत जाती, अंजीरचे अनेक प्रकार असतात. पुणेरी दिनकर, सिमरन, कालिमिर्ना, कडोटा, अश्या अनेक जातीचे रोपे मिळतात. ताजे अंजिरासाठी प्रगतशील शेतकरी घुगुल यांच्याशी संपर्क साधावा व सर्व प्रकारचे फळ, चंदन, मोहगणी, मिलियादुबिया, अशा अनेक रोपांसाठी चापली पवनसूत नर्सरी (मांगरूळ रोड ता. मारेगाव) ला अवश्य भेट द्या!
गणेशपूरात फुलली अंजिराची फळबाग, उत्पन्नात मोठी वाढ! गणेशपूरात फुलली अंजिराची फळबाग, उत्पन्नात मोठी वाढ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 23, 2025 Rating: 5
Powered by Blogger.