सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : बिहार येथील बुद्धगयातील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असून गेल्या कित्येक शतकांपासून हे महाबोधी महाविहार यांचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपविण्यात यावे यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु याकडे भारतातील सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही करिता सध्या ह्या प्रश्नावर संपूर्ण देशव्यापी संघर्ष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत राजूर कॉलरी येथील दीक्षाभूमी बुद्धविहार व बौद्ध बांधवांचे वतीने महामहीम राष्ट्रपती यांना वणी येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देण्यात आले.
बिहार येथील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्धांसाठी पवित्र श्रद्धा स्थान असलेले प्राचीन विहार आहे. त्या ठिकाणी अडीज हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती. ब्रिटिशांचे काळात बौद्ध विचारवंत अनागरिक धम्मपाल (श्रीलंका) यांनी पुनर्जीवित केले होते. गेल्या दोन अडीचशे वर्षांपासून ह्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मियांचे हाती येऊ शकले नाही. त्यासाठी बौद्ध धर्मियांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध बांधवांकडे सोपविण्यात यावे आणि सन 1949 च्या बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून बुद्ध गया महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन गैरबौद्धांपासून मुक्त करावे अशी मागणी ह्या देशव्यापी आंदोलनंतर्गत करीत असताना राजूर येथील बौद्ध बांधवांकडून निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदन देते वेळेस दीक्षाभूमी बुद्धविहार कमिटी चे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, उपाध्यक्ष पंकज कांबळे, माजी पं. स. सदस्य अशोक वानखेडे, ॲड. कुमार मोहरमपुरी, यशवंत पाटील, सोमेश्वर जांगडे व अनेक उपासक उपासिका उपस्थित होते.
बुद्ध गया महाबोधी महाविहार बौद्धांसाठी मुक्त करा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 10, 2025
Rating: