सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील पंढरी लांबट, विनीत जयस्वाल, रोशन आवारी, रघुवीर कारेकर यांनी एकत्र येत मारेगाव मेन रोडवर सुरु केलेल्या "गारवा" फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन आमलकी एकादशीच्या पर्वावर दि.१० मार्च रोजी करण्यात आले.
भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व प्रगतशील शेतकरी पंढरी लांबट यांचे वडील देविदासजी यांच्या हस्ते फित कापून रेस्टॉरंटचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला.
याप्रसंगी नरेंद्र ठाकरे, संजय खाडे, खालिद पटेल, ज्ञानेश्वर चिकटे, अनिल देरकर, सौ.शालिनी दारुंडे, उदय रायपरे, नायब तहसीलदार विवेक पांडे, पत्रकार दीपक डोहणे, अमोल कुमरे, प्रतिभा तातेड, दिलदार शेख, पवन ढवस, संजय जिवणे, चंद्रकांत धोबे, प्रसाद ढवस, विशेष म्हणजे रिल्स स्टार विलास झट्टे यांसह विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडिलांच्या हस्ते प्रतिष्ठानचे उदघाटन: गारवा फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 10, 2025
Rating: