Top News

बुद्धगया: महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या मारेगावात मोर्चा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मारेगावातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम,भारतीय बौद्ध महासभा, व समता सैनिक दल तालुक्याच्या वतीने आयोजित या शांती मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी व्हावे अशी,प्रसिद्धी पत्रकातून माहिती देण्यात आली आहे. तहसील कार्यालयावर शांती मोर्चा दि.11 मार्च ला दुपारी 12.30 वाजता धम्मराजिका बुद्धविहार ते तहसील कार्यालय असा काढण्यात येणार आहे. यावेळी तहसील कार्यालयाला निवेदन सादर करण्यात येणार असून बौद्ध अनुयायिंच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहे.

१) बुध्दीस्ट टेम्पल ॲक्ट १९४९ रद्द करणे. २) बुद्धगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. 

तरी सर्व सामाजिक संघटना व बौध्द बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. 
Previous Post Next Post