माकपाच्या शाखा सचिव पदी सुभाष नांदेकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शाखा अधिवेशन नुकतेच सुकनेगाव येथे पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांचे प्रमुख मार्गदर्शनात व जिल्हा कमिटी सदस्य कॉ. कवडू चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.

या अधिवेशनात मागील तीन वर्षाचा लेखाजोखा आणि टीका आत्मटीका स्वीकारून अहवाल मंजूर करण्यात आले. काही महत्त्वपूर्ण ठराव घेऊन त्याला मंजुरी देण्यात आले. यावेळेस ॲड. कुमार मोहरमपुरी व कवडू चांदेकर यांनी मार्गदर्शन केले. 

पुढील तीन वर्षासाठी सुकनेगाव शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येऊन शाखा सचिव म्हणून कॉ. सुभाष नांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सहसचिव पदी कॉ. देवराव पुसाम तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अर्जुन शेडमाके, विजय तोडकर, कवडू कोराम, पुष्पा मेश्राम, पार्वता नांदेकर, कमल कोराते, सुनील कोरते, बेबी आवारी, विठ्ठल लडके, संतोष नांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

या शाखा अधिवेशनाला गावातील अनेक स्त्री, पुरुष पक्ष सभासद उपस्थित होते.
माकपाच्या शाखा सचिव पदी सुभाष नांदेकर माकपाच्या शाखा सचिव पदी सुभाष नांदेकर Reviewed by सह्याद्री चौफेर on February 09, 2025 Rating: 5
Powered by Blogger.