ललित च्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करा - विनोद मोहितकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील ललित लांजेवार यांचे 29 जानेवारीला धक्कादायक निधन झाले. या निधनाने सारा गांव हळहळला. मात्र,त्यांच्या मृत्याला जबाबदार काही पोलिस खात्यातील कर्मचारी असल्याचा आरोप पत्नी सह आता शिवसेना शिंदे गट यांचे वतीने करण्यात आला असून याबाबत संबंधित त्या पोलीस हवालदाराला पोलीस खात्यातून कायमचे सेवामुक्त करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांनी शुक्रवारी दिनांक 7 फेब्रुवारी ला शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 
'पोलीस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया' या शिर्षकाच्याखाली एका वृत्तपत्रात आलेली बातमी ललित लांजेवार यांनी एका सोशल मीडियाच्या गृपवर व्हायरल केली होती. ही बातमी विकास धडसे, शुभम सोनुले व सागर सिडाम या तिघांच्या फोटोंसह प्रकाशित झाली होती. ती व्हायरल केल्याने ते तिन्ही पोलीस कर्मचारी ललितवर प्रचंड चिडले होते. त्यानंतर विकास धडसे यांनी ललितला गाठून अॅट्रॉसिटीच्या गुन्हात तुला अडकवितो म्हणून धमकी दिली. त्या धमकीने ललित प्रचंड तणावात होता. असा आरोप करण्यात आला. त्यानंतर ललित यांनी 26 जानेवारीला पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडेसुद्धा या घटनेबाबत लेखी तक्रार दिली. परंतु काही समजायच्या आतच ललित यांचा हृदयिकाराच्या धक्क्याने 29 जानेवारी रोजी मृत्यू झाला. याबाबत विनोद मोहितकर हे पोलीस अधीक्षक यांची दोन दिवसांत भेट घेणार आहेत. शिवाय या घटनेच्या अगोदर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व तत्कालीन ठाणेदार अनिल बेहरानी यांनाही ही घटना कळविल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलीस शिपाई विकास धडसे यांच्यावर 7 दिवसांच्या आत कारवाई करून ललित व त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड हे कधीही वणी शहरात येऊ शकतात, व स्व.ललित लांजेवार यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचे सांगितले.
या पत्रपरिषदेत विनोद मोहितकर, सुनील नांदेकर, सुधाकर गोरे, महेश कुचेवार, इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ललित च्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करा - विनोद मोहितकर ललित च्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करा - विनोद मोहितकर Reviewed by सह्याद्री चौफेर on February 08, 2025 Rating: 5
Powered by Blogger.