सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील एका तरुणाची गळफास लावून जिवन संपविल्याची घटना शुक्रवार (ता. 7) ला साडे चार वाजता उघडकीस आली.
खुशाल सुभाष भुसारी (वय 32) रा. दांडगांव,असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या बत्तीस वर्षीय तरुणाने गोठ्यात दोरीच्या साहायाने गळफास घेऊन ईहलोकाची यात्रा केली.
याबाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली, माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून या आत्महत्येने गावात पुरती शोककळा पसरली आहे.
खुशाल याचे पश्चात आई वडील व मोठा आणि लहान भाऊ आहे.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 08, 2025
Rating: