सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : 4 फेब्रुवारीला वणी तालुका केमिस्ट असो.ची मागील सत्राची शेवटची सर्व साधारण सभा पार पडली.या सभेचे अधक्ष मा.श्री रवींद्र येरणे, मानद सदस्य अमरावती झोन तथा उपाधक्ष यवतमाळ जिल्हा केमिस्ट असो. व त्यांचे सहकारी मा.श्री.शंकरशेठ नागदेव ई.सी.मेंबर यवतमाळ जिल्हा केमिस्ट असो.व श्री लक्ष्मीकांत हेडाऊ ई.सी. मेंबर यवतमाळ जिल्हा केमिस्ट असो.यांच्या प्रयत्नाने पारदर्शक पद्धतीने, कुणालाही न दुखवता मागील कार्यकाळ व एकजुटिने काम करण्याची व संघटना बळकट करण्याची तळमळ, व सर्व केमिस्ट सदस्यांचा विश्वास ही जमेची बाजू ठरली. ह्या सर्व बाबींचा विचार करून सभेचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्र येरणे व सहकाऱ्यांनी सर्वानुमते नवीन कार्यकारणी सन 2025 ते 2027 ची निवड करण्यात आली. सर्व केमिस्ट सदस्यांनी परत एकदा लक्ष्मण उरकुडे व त्यांच्या टीम वर विश्वासाने ही जबाबदारी सोपवली आहे.
वणी तालुका केमिस्ट असो ची कार्यकारिणी गठीत
अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे, सचिव श्रीकांत गारघाटे, कोषाध्यक्ष उज्वल पांडे, यवतमाळ जिल्हा ई. सी.मेंबर शंकर शेठ नागदेव, जितेन्द्र डाबरे, विजय बुऱ्हाण, उपाध्यक्ष कपिल उपाध्ये, संदीप डाहुले, राहुल मुंजेकर, उपाध्यक्ष (ग्रामीण) बाबाराव बोबडे, शंकर तुराणकर, सुमित जयस्वाल,सहसचिव उमाकांत भोजेकर, सहकोषध्यक्ष भरतभाई जोबनपुत्रा, ट्रेड रेगुलेशन कमिटी सदस्य अंकुश कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर निवड समिती मध्ये श्री. रवींद्र येरणे,शंकर नागदेव, लक्ष्मीकांत हेडाऊ यांचा महत्वाचा सहभाग होता.या सभेला तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.
वणी तालुका केमिस्ट असोसिएशन ची सर्वसाधारण सभा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 07, 2025
Rating: