चिखलगावच्या पवनने जिल्हास्तरावर मारली लांब उडी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा दिग्रस येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा,चिखलगाव येथील विद्यार्थी पवन दिपक कष्टी याने 6 ते 11 वयोगटात लांब उडी या खेळ प्रकारात जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावून वणी तालुका आणि चिखलगावचा मान वाढवला.
   
याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि गावकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.या अनुषंगाने चिखलगाव, बोधे नगर येथील वासियांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून पवनचा सत्कार केला. हा छोटेखानी कार्यक्रम यावेळी उपस्थित बाल गोपालांसाठी प्रोत्साहन दायक ठरला.
   
यावेळी ग्रामपंचायत चिखलगावचे सदस्य संतोष राजूरकर, रा. प्राथ.शाळा राजूर चे मुख्याध्यापक महेश लिपटे सर, विनोद पाचभाई, सुभाष जगताप, दिपक कष्टी,दशरथ मांदाडे, देवेंद्र लांबट, विनोद पारखी, सचिन कवाडे, सुरेश कनाके, श्याम कुत्तरमारे, रोहित गेडाम, सुनील टोंगे, वैभव राजूरकर आदी गावकरी उपस्थित होते.
चिखलगावच्या पवनने जिल्हास्तरावर मारली लांब उडी चिखलगावच्या पवनने जिल्हास्तरावर मारली लांब उडी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 06, 2025 Rating: 5
Powered by Blogger.