पहापळ येथे टिबी मुक्त अभियानाचा शुभारंभ!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय टिबी मुक्त अभियानाचा शुभारंभ पहापळ येथे करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राहुल आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणुन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना देठे, मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष इंगळे, वैद्यकिय अधिकारी, डॉ. जुनगरी,वरीष्ठ औषधोचार पर्यवेक्षक डॉ.रामटेके, पेसा कोष समीतीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य भैय्याजी कनाके, उपस्थित होते.

पहापळ येथील आयुष्यामान आरोग्य केंद्रात शुभारंभ करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसात टि.बी मुक्तीसाठी विविध उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यां वंदना पुसदेकर, यांचा पेसा समीतीचे अध्यक्ष भैय्याजी कनाके, सरपंच राहुल आत्राम, याच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
सुत्रसंचालन कु.तिडके,प्रास्ताविक आणि आभार रामटेके, यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शारदा ठाकरे, युगल पेंदोर, माया गेडाम, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
पहापळ येथे टिबी मुक्त अभियानाचा शुभारंभ! पहापळ येथे टिबी मुक्त अभियानाचा शुभारंभ! Reviewed by सह्याद्री चौफेर on February 06, 2025 Rating: 5
Powered by Blogger.