सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश पहापळे यांना अखिल कुणबी महासंघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पद बहाल करण्यात आले. या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी के आरिकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
अखिल कुणबी महासंघ संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी वाटचाल करणारी संघटना आहे. महापुरूषांचा विचार कुणबी समाजात रूजवून सर्व पोटजातींना एका विचारांनी कुणबी समाजाची संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशिल करणार असल्याचे पहापळे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून राजेश पहापळे यांची समाजकार्यात असलेली तळमळ, कुणबी समाजातील काम, सेवाभावी वृत्ती विचारात घेऊन, त्यांना अखिल कुणबी महासंघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.ते यापुढेही समाजकार्य करतील असा आशावादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी के आरिकर यांनी व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडीबाबत समाजातील युवा वर्गात, नेतेमंडळी, महीला मंडळ तसेच सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनसह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेश पहापळे यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 06, 2025
Rating: