सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर काढुन स्माॅर्ट मिटर लावण्याचे धोरण विज वितरण कंपनीने सुरु केले आहे.या धोरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कडाडुन विरोध केला आहे. या अनुषंगाने भाकपने म.रा.विज वितरण कंपनीच्या वणी व झरी येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले.
निवेदनात स्मॉर्ट मिटर लावण्याचे धोरण बंद करावे,सन 2020-21 पासुन शेती पंपाच्या विज पुरवठ्याकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन विनाअट तत्काळ द्या, शेतीसाठी सौरऊर्जा कनेक्शनची सक्ती करू नये ती ऐच्छीक करावी या मागण्याचा समावेश आहे.
या मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व विज वितरण कार्यालयावर भाकपचे वतीने प्रचंड मोर्चे काढण्याचा ईशारा म.रा.किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल हेपट यांनी दिला. निवेदन देताना भकपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे-कॉ.अनिल हेपट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 02, 2025
Rating: