कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : कोलार पिंपरी, गोवारी या शिवारात वाघाचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशा आशयचे निवेदन वणी तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने वनविभाग अधिकारी यांना देण्यात आले आहे. 

यावेळी यवतमाळ मध्यवर्ती बॅकचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, तालुका कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष घनश्याम भाऊ पावडे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रफुल्ल उपरे, दिलीप पिदुरकर, रविन्द्र होकम, निवृत्ती ठावरी, मोहन सातपुते, बंडु मालेकर, दिनेश पाऊणकर, धिरज भोयर, प्रेमनाथ मंगाम,सोनु पिदुरकर, गंगाधर परचाके,मधुकर सावे, उमेश चांदेकर, प्रमोद ठाकरे, गोवर्धन पिदुरकर, ज्ञानेश्वर बेलेकर, युवराज ठाकरे, इत्यादि नागरिक उपस्थित होते.

निवेदनात कोलार पिंपरी,गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे आहे, त्या झुडपात जंगली जनावरे माणसावर व पाळीव जनावरांवर हल्ले करीत आहे. या आधी सुध्दा एका इसमावर प्राणघातक हल्ला करून तो इसम मरण पावला, गावातील अनेक जनावरांवर सुध्दा हल्ला झाला आहे. गावात वाघाची दहशत पसरली आहे तरी, या परीसरातील वाघ, आस्वल, निलगाय व इतर जनावरांची विल्हेवाट लावण्यात यावी,अन्यथा परीसरातील नागरीकांना सोबत घेऊन तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा ईशारा देण्यात आला आहे. 
        

कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर Reviewed by सह्याद्री चौफेर on February 03, 2025 Rating: 5
Powered by Blogger.