विरकुंड येथील 'आमदार चषक' कबड्डीच्या सामन्यात “हास्य दर्पण” नाट्य प्रयोगाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

 वणी : विरकुंड येथे होत असलेल्या 'आमदार चषक' कबड्डी सामन्याचे आयोजन संयोजक विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने ६ फेब्रु. पासुन होत असुन यामध्ये ना भुत, ना भविष्य अशा कबड्डी सामन्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव (विरकुंड) च्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित आमदार संजय देरकर असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चोरडीय तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मोरेश्वर उज्वलकर, आनंदकुमार शेंडे, संजय साखरकर तसेच विशेष मार्गदर्शक देवेंद्र बच्चेवार असणार आहे. उद्धाटकिय समारंभ आटोपताच परिसरातील लोकांच्या मेजवाणीसाठी 'हास्य दर्पण' या एकपात्री नाट्यप्रयोग परिसरातील नागरीकांसाठी ठेवण्यात आला आहे. 

संपुर्ण विदर्भात गाजत असलेल्या प्रा. हेमंत चौधरी यांच्या एकपात्री नाट्य प्रयोगाला संपुर्ण कला क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.त्यामुळे या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात जनतेनी आनंद घेण्याचे आवाहन आयोजन समितीचे विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या नाटकाचे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात येत आहे. या सामाजिक घडामोडींवर आधारित नाट्य प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक विलास कालेकर व जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव (विरकुंड) च्या वतीने करण्यात आले आहे.
विरकुंड येथील 'आमदार चषक' कबड्डीच्या सामन्यात “हास्य दर्पण” नाट्य प्रयोगाचे आयोजन विरकुंड येथील 'आमदार चषक' कबड्डीच्या सामन्यात “हास्य दर्पण” नाट्य प्रयोगाचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 02, 2025 Rating: 5
Powered by Blogger.