कुंभा येथे आदिवासी गोंड गोवारी महीला मंडळाचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील कुंभा येथे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती महीला आघाडीच्या वतीने नुकताच स्नेहमिलन तथा हळदी कुंकू,वाण वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
         
समितीच्या कुंभा शाखा महीला आघाडीच्या वतीने आयोजित सदर कार्यक्रमात महीला आघाडीच्या नेत्या सौ.राधिका माधव कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.यावेळी गावातील शेकडो महीलांना सौ.राधिका कोहळे यांचे हस्ते हळदी कुंकू लाऊन वाण वाटण्यात आले.हा कार्यक्रम अत्यंत हर्षोल्हासात पार पडला.सायंकाळी गावातील सर्व समाज बांधवांच्या वतीने सामुहीक जेवनाच्या कार्यक्रमाने स्नेहमिलन सोहळ्याची सांगता झाली.
       
यावेळी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.सारीका मारोती सरवर,सौ.कविता शञुघन ठाकरे,सौ.जोत्स्ना नेहारे,गंगा ठाकरे,पुष्पा राऊत,सुरेखा दुधकोहळे,सुनंदा कोहळे,शैला कोहळे,राधा खंडरे,वंदना खंडरे,लता खंडरे,आशा कोहळे,वैशाली राऊत,शेवंताबाई ठाकरे,कमल ठाकरे,पुजा ठाकरे,मंगला राऊत,वंदना खंडरे,सुनिता नेहारे,प्रणाली राऊत,शैला दि.कोहळे,अर्चना कोहळे,चंद्रकला खंडरे यांचेसह अनेक महीलांनी सहभाग व मेहनत घेतली.
कुंभा येथे आदिवासी गोंड गोवारी महीला मंडळाचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न कुंभा येथे आदिवासी गोंड गोवारी महीला मंडळाचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 01, 2025 Rating: 5
Powered by Blogger.