सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मेटीखेडा : "कॉम्रेड शंकरराव दानव यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या संघटना बांधून त्यांच्यासाठी संघर्ष करण्यात खर्ची घातल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावात त्यांचा दांडगा संपर्क होता व प्रत्येक गावातील सर्वात पिचलेल्या वर्गासोबत त्यांची बैठक होती. पोळ असो, तांडा असो किंवा पारध्यांची वस्ती असो ते सातत्याने त्यांचा भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आणि त्यांना त्यांचा समस्यांवर मात करण्यासाठी संघर्षासाठी तयार करीत."
"शोषित, वंचित कष्टकऱ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक संघटने बांधली आणि त्यांचा शेवटचा श्वास घेत पर्यंत ते संघर्षरत होते. परंतु त्यांना प्राप्त झालेली ही विशिष्ट शैली व विचार कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी विचारातून आली असल्यामुळे त्यांनीं आपले अनमोल आयुष्य स्वतःचा स्वार्थ न बघता पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी दिले. मार्क्सवादी वैचारिक जाणिवेतून त्यांचा जगाकडे पाहण्याचा एक उत्तम दृष्टिकोन निर्माण झाला होता. तो दृष्टिकोन त्यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना दिला असल्याने त्यांचा हाच वैचारिक पाया मजबूत करीत यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील व कष्टकऱ्यांची बाजू मजबूत करीत संघर्ष सुरू ठेवतील." असा सूर दिनांक ३१ जानेवारी ला पालोती ( मेटीखेडा ) येथे झालेल्या कॉ. शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यातील उपस्थित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मनोगतातून आणि मार्गदर्शनातून व्यक्त केला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. दानव यांचा प्रथम स्मृती दिन कळंब तालुक्यातील पालोती (मेटीखेडा) येथे मेळावा घेऊन त्यांचा विचारांना आणि कार्याला सलाम करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याचा अध्यक्षस्थानी कॉ. सदाशिव आत्राम हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, जि. क. सदस्य कॉ. ॲड. डी. बी. नाईक, किसान सभेचे राज्य सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. देविदास मोहकर, जि. क. सदस्य कॉ. अनिता खूनकर, आशा वर्कर संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, कॉ. मनिष इसाळकर, कॉ. निरंजन गांधलेकर, कॉ. रमेश मिरासे, कॉ. कवडू चांदेकर, सरिता दानव आदी उपस्थित होते. यावेळेस कॉ. शंकरराव दानव यांचा पत्नी श्रीमती कलावतीबाई दानव ह्यासुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या.
ह्या कॉ. शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृतिदिना निमित्त झालेल्या मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक गावातील प्रमुख स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कळंब तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
कॉ. दानव यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य पक्ष कार्यकर्ता मेळावा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 01, 2025
Rating: