महादीप परीक्षेत विमानवारी करीता पात्र विद्यार्थीनी सोनाक्षी उईके हिचा सत्कार


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : ११ जानेवारी २०२५ रोजी जि. प. वरिष्ठ प्राथ. शाळा नरसाळा ची विद्यार्थिनी कु. सोनाक्षी उईके हिचा सत्कार IBTA शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये सोनाक्षी ने अतिशय मेहनत करून महादीप परीक्षेत यश मिळविले. प्रतिकूल परिस्थिती खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवून सोनाक्षी ने भरारी घेतली. घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. तरी सुद्धा सोनाक्षी ने हार मानली नाही. 

यावेळी IBTA शिक्षक संघटना मारेगाव चे अध्यक्ष श्री. संजय आत्राम सर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. प्रमोद चांदुरकर सर, जेष्ठ मार्गदर्शक श्री. हरीश दरबेशवार सर, IBTA मारेगाव चे कार्याध्यक्ष मोहन ठाकरे सर, सचिव सिद्धार्थ ढवळे सर, कार्यालयीन सदस्य, वामन राठोड सर, अनिल गरकळ सर, संतोष भोपळे सर, प्रविरसिंग राठोड सर, IBTA उपाध्यक्ष शैलेश मुडारप सर उपस्थित होते. यावेळी सोनाक्षी ला IBTA शिक्षक संघटनेच्या वतीते ड्रेस, स्कूल बॅग, पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला.
महादीप परीक्षेत विमानवारी करीता पात्र विद्यार्थीनी सोनाक्षी उईके हिचा सत्कार महादीप परीक्षेत विमानवारी करीता पात्र विद्यार्थीनी सोनाक्षी उईके हिचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2025 Rating: 5
Powered by Blogger.