सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती पांढरकवडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय शैक्षणिक संस्था,पांढरकवडा (ता.केळापूर) द्वारा अखिल बहुजन समाजाचे मन मस्तिष्क सर्वार्थाने बळकट व्हावे या प्रेरक हेतूने बहूजन समाजाच्या पाठीचा कणा ताठ करणाऱ्या ज्ञानदीप लावून अज्ञानाच्या श्रृंखला तोडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी व भारतातील प्रथम मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख यांची जयंती ०९ जानेवारी तसेच राष्ट्रमाता मा.जिजाऊ आणि युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैचारिक व बौध्दिक खाद्य पुरविण्याच्या उद्देशाने ०३ जानेवारी ते ०९ जानेवारी पर्यंत वर्ग ०८ ते ११ व वर्ग १२ ते पदविधर विद्यार्थ्यांकरीता निःशुल्क ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा तसेच महिलांकरीता ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती, या स्पर्धेचे बक्षिस वितरण व मानसिक बळ उंचविण्यासाठी प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन आज दि.१२ जानेवारी रविवार रोजी संध्याकाळी ०६ ते ०९ पर्यंत मित्र क्रीडा मंडळ पांढरकवडा येथे यवतमाळ येथील प्रविणभाऊ विनायकराव देशमुख,महाराष्ट्रातील समता एक्स्प्रेस,सुप्रसिद्ध सामाजिक विचारवंत,महाराष्ट्रातील अभ्यासु चिंतनशील वक्ते यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर बेले,सल्लागार,केळापूर तालुका तिरळे कुणबी समाज संघटना,उद्घाटक राजुभाऊ मोट्टेमवार,नायब तहसिलदार,प्रमुख उपस्थिती दिनेश झामरे,पोलीस निरिक्षक,पांढरकवडा,प्रमुख उपस्थिती डॉ. प्रिती तोटावार,डॉ.प्रतिभा तोडासे,वैद्यकिय अधिकारी पांढरकवडा,सौ.रेखाताई राजु मोहले,अध्यक्ष अ.भा.माळी महासंघ,सौ.वर्षाताई विजय ठाकरे,अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड,सौ.ज्योतीताई श्यामकुवर,मुलनिवासी महिला संघटक,सौ. शशीकलाताई चव्हाण,अध्यक्ष तेली समाज विचार मंच, पांढरकवडा,सौ.नुजहत अफरोज काज़ी जमीलोद्दीन,मुख्याध्यापिका न.प.उर्दू शाळा पांढरकवडा, सौ.प्रणालिका वैभव जिड्डेवार,पेरकी समाज संघटना विद्या सुभाष राठोड,बंजारा समाज संघटना, सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वक्तृत्व स्पर्धे गट 'अ', वक्तृत्व स्पर्धा 'ब', निबंध स्पर्धा (महीलासाठी) बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता माँ जिजाऊ जयंती उत्सव समिती पांढरकवडा,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय शैक्षणिक संस्था पांढरकवडा यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे समितीचे अध्यक्ष श्रीराम भेंडारे यांनी आवाहन करण्यात आले आहे,
आज पांढरकवडा येथे वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा व प्रबोधनात्मक कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 12, 2025
Rating: