खळबळजनक: वणीत आढळले गायीचे शेकडो शीर, हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना कायद्याची कशी पायमल्ली केली जात आहे. हे वणी शहरात अनेक गायीचे शीर आढळून आल्याचा प्रकार समोर आल्याने येथील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून सदर घटनेचा तीव्र निषेध सोशल माध्यमातून व्यक्त केल्या जात आहेत.

वणी शहरात गौ-माते वर झालेल्या ह्या निर्घुण घटनेचा मी तीव्र निषेध करतो. जे कोणी कृत्य केले असतील त्यांचे वर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी.
-रवि बेलूरकर अध्यक्ष,श्री. रामनवमी उत्सव समिती, वणी 

वणी शहरातील जत्रा मैदान परिसरात काही गायीची कत्तल झाल्याचे उघडकीस आले. मटण मार्केट ते लालगुडा रस्त्यावरील बिअर बार नजीक अगदी रस्त्यावर दोन गायी चे शीर आणि मास आढळून आले. तसेच बाजूलाच असलेल्या कत्तलखान्या जवळ अनेक जनावरांचे शीर आढळून आले असता जत्रा मैदान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.पोलीस प्रशासन व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. दरम्यान, सदर कत्तलखाना उध्वस्त करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

गोहत्या प्रकरणातील घटना स्थळाची पाहणी करून आमदार संजय देरकर यांनी आरोपींना तात्काळ अटक करुण संपूर्ण प्रकरणाचे मूळ तपासण्याचे पोलिसांना आदेश दिले. वणीतील गोमांस तस्करी बद्दल विधानसभेत आवाज उठविणार.
-आमदार संजय देरकर 

खळबळजनक: वणीत आढळले गायीचे शेकडो शीर, हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध खळबळजनक: वणीत आढळले गायीचे शेकडो शीर, हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2025 Rating: 5
Powered by Blogger.