टॉप बातम्या

अखेर दोन मित्रांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील दोन मित्रांचा निंबाळा (ता. वणी) नजीक रोही आडवा आल्याने जबर अपघात झाला व त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना 7 जानेवारी रोजी दुचाकी क्र. एम.एच.31,ए.एच. 0340 ने वणी वरून मारेगाव कडे येताना घडली होती.
 
दोघांनाही पुढील उपचाराकरीता वणी नंतर नागपूरला हलविण्यात आले. मात्र, तब्बल चार दिवस कोमात असलेल्या दोघांचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व आज शनिवार 11 जानेवारी ला पहाटेच्या दरम्यान जखमी विजय याची प्राणज्योत मालवली. तर काही वेळातच दुसरा मित्र नितीन यानेही अखेरचा श्वास घेतला.

विजय संभाजी थेरे (वय 35) नितीन खुशाल पायघन (वय 28) दोघेही रा. पहापळ असे मृत तरुणांचे नाव आहे.दोन मित्रांच्या मृत्यूने संपूर्ण पहापळ गाव हादरून गेले असून, गावात शोककळा पसरली आहे.

दोघांच्याही पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी सव्वा 6 वाजताचे दरम्यान शोकाकुल परिस्थितीत पहापळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय थेरे याच्या पश्चात आई पत्नी व सहा वर्षाची मुलगी आहे, तर नितीन पायघन हा अविवाहीत होता त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post