सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
पॅशन कंपनी क्र.(MH 34 AC 9424) ने वनोजा (देवी) या आपल्या गावाकडे जात असतांना दुचाकी अनियंत्रित होऊन सचिन हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या गडयात पडला. रात्रीची वेळ असल्याने हा अपघातग्रस्त युवक कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. त्यामुळे त्याला कुणाचीही मदत न मिळाल्याने रात्रभर जखमी अवस्थेतच तो पडून राहिला. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. असा कयास वर्तविण्यात येत आहे.
सचिन मडावी हा एसटी महामंडळात नोकरीवर असल्याचे समजते. मात्र, मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. 24 जानेवारीला काही कामानिमित्त तो दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र, गावी परततांना रात्री उशिरा नांदेपेरा पहिले स्टॉप नजीक वळणावर दुचाकीला अपघात झाला. आणि अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज पहाटे मॉर्निंग वोक करणाऱ्या काही लोकांना सचिन हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून दिसला. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.
सचिन यांच्या पश्चात आईवडील, पत्नी,एक मुलगी असा परिवार असून सदर घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू, नांदेपेरा जवळील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 25, 2025
Rating: