सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी बार असोसिएशन (वणी वकील संघ) ची २०२५-२६ या पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ ला झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल मध्ये झालेल्या चुरशीचा लढाईत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल चे ७ तर ॲड. निलेश चौधरी यांचा विकास पॅनल चे ४ सभासद निवडून आले. १०५ अंतिम मतदार यादीतील १०२ वकिलांनी मतदानात भाग घेऊन आपल्या मताचा कौल दिला. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. शाम गायकवाड यांनी दिवसभर निवडणुक प्रक्रिया योग्य पद्धतीने सांभाळून पारदर्शकपणे निवडणूक निकालाची सायंकाळी ७ वाजता घोषणा केली.
निवडणूक निकालाची ॲड. शाम गायकवाड यांनी घोषणा केल्यानंतर ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने गुलाल उधळून व बँड चा तालावर नाचून आपला विजय साजरा केला.
ॲड. निलेश चौधरी व ॲड. वीरेंद्र महाजन यांनी आपापल्या पॅनल ला निवडून आणण्यासाठी प्रत्येक वकिलांची प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोन्ही पॅनल नी घोषणा पत्रके सुद्धा प्रकाशित केली होती. वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांचे अनेक प्रश्न असल्याने या निवडणुकीत त्याला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य झाले. दोन्ही पॅनल नी आपल्या घोषणा पत्रकात अनेक महत्त्वाचे मुद्दे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निवडणुकीत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने बाजी मारत अध्यक्ष पद ॲड. वीरेंद्र महाजन, उपाध्यक्ष पद ॲड. यशवंत बरडे, सचिव पद ॲड. अमोल टोंगे, सहसचिव पद ॲड. रामेश्वर लोणारे आणि तीन सदस्य पदे ॲड. दिलीप परचाके, ॲड. चंदू भगत व ॲड. आकाश निखाडे अशी ७ पदे खेचून घेतली तर ॲड. निलेश चौधरी यांच्या पॅनल ने कोषाध्यक्ष पद ॲड. प्रेम धगडी व सदस्य पदे ॲड. दुष्यंत बोरुले, ॲड. अविनाश बोधाने व ॲड. प्रतीक्षा शेंडे अशा ४ पदावर समाधान मानावे लागले. स्वतः ॲड. निलेश चौधरीला अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत फार कमी मताने पराभवाला सामोरे जावे लागले. एकता व विकास पॅनल मध्ये विकास पॅनल चा पराभव तर एकता पॅनल चा विजय झाला.
वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकीलांसाठी बसण्यासाठी जागा, महिला वकिलांसाठी विशेष बार रूम, नवीन दिवाणी न्यायधीस वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभी करणे, परीक्षा देणाऱ्या वकीलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणे, ई विधी ग्रंथालय उभारणे, तिन्ही भाषेतील वृत्तपत्रे सुरू करणे, अत्याधुनिक कॅन्टीन, वकिलांचा वाहनांसाठी पार्किंग, महसूल कार्यालयात वकिलांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करणे, आदी व अन्य प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आश्वासन दोन्ही पॅनल ने केली होती. ती या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याचा दबाव या नवीन कमिटी ला राहणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका पॅनल ला पूर्ण बहुमत न मिळाल्याने या नवीन कमिटीला सामंजस्याने वकिलांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील एवढे मात्र खरे.
वणी वकील संघाचा निवडणुकीत चुरशीचा लढाईत एकता पॅनल ला ७ तर, विकास पॅनल ला ४ पदे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 25, 2025
Rating: