अपघात की घातपात? वणी-नांदेपेरा महामार्गावर दुचाकी सह युवक आढळला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील नांदेपेरा गावाजवळ महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात एक युवक (अंदाजे वय 35) जागीच मृतावस्थेत आढळून आले आहे. 

मॉर्निंग वोक करणाऱ्या नागरिकांना हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत दुचाकीसह पडून दिसला, एक युवक पडून असल्याची ही वार्ता समजताच गावातील पुरुष महिला मंडळी घटनास्थळी धाव घेत त्याला पाहण्यासाठी जमली होती. सदर घटना रात्री च्या सुमारास घडली असावी असा उपस्थित नागरिकांतून कयास यावेळी व्यक्त होत होता. मात्र,हा अपघात की घातपात? याबाबत तूर्तास अस्पष्टता असून वृत्त लिहेपर्यंत संबंधित विभाग घटनास्थळी दाखल व्हायची होती. 

वणी-नांदेपेरा हा 11 किलोमीटर लांबीचा असणारा महामार्ग सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. महामार्गावर गेल्या वर्षात अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. नांदेपेरा गावाजवळील टर्निंग धोकादायक असल्याचे बोलल्या जाते. या वळणावर वाहन चालवताना अति दक्षता बाळगावी लागते, अन्यथा अपघात निश्चित. याचं ठिकाणी काही महिन्याअगोदर मोठा ट्राला रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घुसला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वाहणाचे मोठे नुकसान झाले. आज सकाळी उघडकीस आलेला अपघात त्याच वळणावर झाल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे.
अपघात की घातपात? वणी-नांदेपेरा महामार्गावर दुचाकी सह युवक आढळला अपघात की घातपात? वणी-नांदेपेरा महामार्गावर दुचाकी सह युवक आढळला Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.