टॉप बातम्या

यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या वतीने ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : ३ फेब्रुवारी रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या वतीने,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसोनी येथे ज्ञानजोती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  शाळेच्या मुख्याध्यापिका परसावर मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पळसोनी ग्रामपंचायत च्या सरपंच नलिनीताई दुधबळे, उपसरपंच पुखराजभाऊ खैरे व यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या सदस्य काजलताई वाळके, प्रेम अडकिने, श्वेताताई माहुरे, अंकिताताई पथाडे उपस्थित होते. 

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शिक्षणाचे महत्त्व काय आहे,हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व काजलताई वाळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भर टाकत त्यांचे आपल्यावर असलेले उपकार हे अमोलनिय आहे,असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडले व प्रेम अडकिने सर यांनी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे ध्येय काय आहे व महापरिनिर्वाणदिनी मिळालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे वाटप कशा पद्धतीने होईल यावर विश्लेषण करून आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी आयोजित "एक पेन एक वही" या उपक्रमात आलेल्या शालेयपयोगी साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मार्गदर्शक श्री.हेमंत टिपले सर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सर्व सन्माननीय पदाधिकारी रज्जत सातपुते, आकाश बोरकर, सुरज खैरे, गौरव जवादे, आदित्य वाळके, अश्विनीताई अडकिने, ऋचाताई दारुंडे, राहुल घोस्की, इस्माईल खान उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे संचालन श्री.गजानन मडई सर यांनी केले व आभार माननीय आकाश खोब्रागडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गशिक्षकांनी आपला फीडबॅक दिला व मुख्याध्यापिका परसवार मॅडम यांनी उपक्रमाचे कौतुक करून लेटर पॅड वर वितरित झालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे लेखी स्वरुपात शुभेच्छा पत्र दिले.
Previous Post Next Post