सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील आदर्श हायस्कूल येथून निवृत्त झालेले हरिप्रसाद पांडे गुरुजी यांचे वणी येथे पुत्र विवेक पांडे यांचे निवासस्थानी सकाळी ९.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते.
स्वर्गवासी पांडे गुरुजी यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असून ते विध्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांचा हिंदी विषय शिकविण्यात हातखंडा होता. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीत सक्रिय रहात त्यांनी नाट्यअभिनय व पत्रकारिताही जोपासली. महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी दै. लोकसत्ता साठी त्यांने बरेच वर्ष काम केले.
दुपारी २ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मारेगाव येथील लर्नर्स अकॅडमी स्कूल मध्ये ठेवण्यात आले, अनेक चाहत्यांनी अंतिम दर्शन केल्यानंतर सायंकाळी ५. ४५ वाजता मुखागनी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.
स्व. पांडे गुरुजी यांचे पशच्यात पश्चात पत्नी गीतादेवी, पुत्र शैलेश पांडे, विवेक पांडे, जावई, मुलगी कल्पना माळोदे (पांडे) एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, सतिष पांडे, नातवंड असा आप्त परिवार आहे.