लाभ योग्यतेनुसार देण्यात यावा, परीक्षार्थी यांची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पंचायत समिती वणी अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत नांदेपेरा येथील शिपाई पदभरती घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये परिक्षा सभागृहात संबंधीत अधिका-याने घोळ निर्माण करून परिक्षेच्या नियमाची पायमल्ली करण्यात आली, संबंधित अधिका-यावर कार्यवाही करून झालेली शिपाई पदभरती निष्पक्षपणे चौकशी करून योग्यतेनुसार परिक्षेत बसलेल्या परिक्षार्थीच्या योग्यतेनुसार निवड करा, अशा आशयचे निवेदन गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले. 

वणी तालुक्यातील नांदेपेरा ग्रामपंचायत येथील शिपाई पदाच्या भरतीकरीता पंचायत समिती वणी तर्फे एकुण १० विद्यार्थ्यांची परिक्षा दिनांक ३०/१२/२०२४ रोजी घेण्यात आली. सदर लेखी परिक्षा संपल्यानंतर पंचायत समिती वणी यांच्या द्वारे अर्ध्या तासानंतर निकाल तोंडी स्वरूपात घोषीत करण्यात आली व या निकालामध्ये रविंद्र देविदास ढवस यांना उत्तीर्ण करण्यात आले.मात्र,जो परिक्षार्थी यांचा मागील खुप दिवसापासुन शिक्षणाचा गंध नाही त्याला सभागृहातील परिक्षकाने सहकार्य करून त्याला उत्तीर्ण करण्यात आले, असा आरोप निवेदन कर्त्यांनी केला आहे. या बाबत त्यांनी दिनांक ३१/१२/२०२४ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बाबत पत्र लिहुन सविस्तर माहिती दिली आहे. असं निवेदनात नमूद असून याबाबत तत्काळ समिती नेमून पुनःश्च परीक्षा घेऊन,होतकरु व गरजू व्यक्तींना त्यांचा लाभ त्यांच्या योग्यतेनुसार देण्यात यावा,अशी मागणी परीक्षार्थी यांनी केली आहे. तसेच झालेला घोळ याची चौकशी करून संबंधित अधिका-यावर कार्यवाही करण्यात यावी अशी देखील मागणी निवेदनकर्त्यांनी निवेदनातून केली असून या प्रकरणाची चार दिवसात दखल घ्यावी,अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनावर सचिन चिकटे,तुषार खामणकर,पवन कोडापे, अजय किन्हेकर, राहुल वांढरे, धीरज खामणकर,प्रवीण खैरे, साहिल ठमके,प्रफुल यावले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.