सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वर्षभर लोकांनाच प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी धडपडणाऱ्या, न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करणाऱ्यां,पत्रकारांना खरच समाजात काही स्थान आहे का?एका दिवसासाठी तरी त्याच्या विषयी कोणताच पुढारी, पक्ष कार्यकर्ते, सामान्य माणुस तरी कृतज्ञता व्यक्त करतो का?तर या प्रश्नाचे उत्तर साधारणपणे नाहीच असेच आहे. मात्र अपवाद वगळता काही बांधवानी मला सकाळ पासुनच शुभेच्छा दिल्या त्या बद्दल त्यांना मी धन्यवाद देतो,आभार पण मानतो की समाजात अजुनही सुज्ञ आणि जागरुक नागरिक आहेत ज्याच्यामुळे आमच्या लेखणीला बळ मीळते आहे. पण अपवाद वगळता मात्र सर्वसाधारणपणे जो अनुभव आला त्याबद्दल काही तरी लिहीले पाहीजे म्हणुन हा लेखप्रपंच आहे.जेव्हा केव्हा एखाद्या प्रकरणाला वाचा फोडायची आहे,चळवळीचा संदेश समाजा पर्यंत पोहचवायचा आहे अशावेळी माध्यमाची आठवण झाल्या शिवाय पुढाऱ्याला राहात नाही.पिडीताच्या समस्या लावुन धरायच्या आहेत अशा वेळी पुढाऱ्या पेक्षा केवळ पत्रकार जास्त जवळचा वाटतो, समस्याग्रस्त अडचणीत सापडला असेल तो आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असेल मध्यस्ती करायची असेल अशा वेळी आठवण होते ते केवळ पत्रकाराचीच, निवडणुका आल्या द्या प्रसिद्धी, निवडुन आला द्या प्रसिद्धी, काही पगार नाही, मानधन नाही, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून खंबीरपणे लिखाण करतो आहे. सरकारे आली गेली पण लाडका पत्रकार म्हणुन त्याच्या सणाला काहीच घोषणा नाही. एखादा पत्रकार निर्भिडपणे भ्रष्टप्रवृत्तीवर लिखाण करेल त्याच्या वाट्याला हल्ले, धमकी,खोटे गुन्हे नोंद केलेले आढळेल असे असले तरी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवुन न डगमगता पत्रकार आपले कर्तव्य निस्वार्थ मनाने सातत्याने बजावत आला आहे.भाषणात फक्त पत्रकार समाजाचा आरसा आहे. एवढी चांगुलपणा व्यक्त करणे आणि सर्व पत्रकाराची सहानुभुती मीळविणे याशिवाय काहीच कानी पडत नाही. वर्षभरातला एक दिवस सुध्दा त्याच्या कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायला कोणाच जवळ वेळच नसेल का ? कदाचीत या दिवसाचे महत्व घटकाना माहीती नसेल आणि म्हणुनच आमचा पत्रकार बांधव वर्षभरातला एकदिवस एकमेकांना शुभेच्छा देतो आणि आपलीच पाठ आपणच थोपटुन घेत पत्रकार दिवस साजरा मानतो. पारंपारीक पध्दतीने सुरु असलेल्या या सणा बद्दल माझ्यासह अनेक पत्रकार बांधवाच्या मनातील ही खंत मी व्यक्त केली आहे. बर खुप कमी संख्येने असलेले ही जात त्याचा सण साजरा करण्यासाठी खुप गाजावाज करण्याची गरज नाही. गाजावाजा करण्याचे माध्यम निशुल्क आहे .कोणी पुढाकार घेतलाच तर खर्च पण नाही मात्र कोणीही पुढाकार घेत नाही आणि त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करत नाही,याबाबतचे कारण काय असु शकते हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्या परिवाराला तर सोडाच केवळ त्याला सुध्दा ईतर घटका कडुन सार्वजनिक रित्या शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेताना दिसुन येत नाही. एवढा स्वार्थी समाज आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतो तरीही निस्वार्थ सेवा देण्यासाठी आम्ही अजुनही तत्पर आहोत.नविन वर्षात घडणाऱ्या घटना बद्दल आम्ही तत्पर आहोत सर्व सामान्य, पिडीत, शोषित, प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, पुढारी, अशा सर्व घटकांनी आमच्या कडुन वर्षभर मोफत प्रसिद्धी करुन प्रसिद्धी मिळवुन घ्यावी, यासाठी माझ्या सह माझ्या विचाराच्या पत्रकार बांधवा कडुन पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख समृद्धी भरभराटी मीळो एवढी अपेक्षा...
पत्रकार
माणिक कांबळे
9623483682