सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिवसेनेचे कार्यकर्ते ललित लांजेवार (45) यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. या धक्कादायक घटनेने वणी उपविभागात शोककळा पसरली आहे.
ललित लांजेवार हे शिवसेना (शिंदे गट) वणी शहराचं नेतृत्त्व करत होते. ते शिवसेनेचे कट्टर, धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
दि. 29 जाने. बुधवारला रात्री त्यांना छातीत कळा येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लगेच येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होत,मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. ही धक्कादायक वार्ता शहरात पसरताच त्यांच्या मित्र परिवारांनी रुग्णालयाकडे धाव घेत एकच गर्दी केली होती. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा,अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने परिचित असलेले ललित लांजेवार यांची अचानक "एक्झिट",सामाजिक राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
शिवसैनिक ललित लांजेवार यांचे दुःखद निधनावर शहरातील अनेकांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहेत.
-सह्याद्री चौफेर परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
धक्कादायक : शिवसैनिक ललित लांजेवार यांचं निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2025
Rating: