एस टी भाडेवाढ विरोधात शिवसेना आक्रमक, वणीत चक्का जाम आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्र्याचा धिक्कार असो, परिवहन मंत्री हाय.. हाय, फडणवीस सरकार मुर्दाबाद, परिवहन मंत्र्याचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय अशा जोरदार घोषणांनी शिवसैनिकांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला. शिवसेनेच्या वतीने भाडेवाढीच्या विरोधात राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत जोरदार आंदोलन करून एक तास चक्काजाम केले.पोलिसांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घाम फोडला. अखेर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन अटक केली.

राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरामध्ये 15 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर तिकीटाचा अतिरिक्त भुर्दंड पडला आहे. प्रवाशांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, भाडेवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आक्रमक होत वणी बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन केले. गेटवरच शिवसेनेचे आमदार संजय देरकर, संजय निखाडे, सुनील कातकडे, दीपक कोकास, रवि बोढेकर, राजू तुराणकर, सुधीर थेरे, साबीर शेख, प्रवीण खानझोडे, सुरेश शेंडे, संतोष माहुरे, सोमेश्वर गेडेकर, आनंद घोटेकर, तुळशीराम काकडे, अजय चन्ने, महेश सोमलकर, मनोज वकटी, सरपंच सौ.गीता उपरे, सौ.सुनंदा गुहे, सौ.वृषाली खानझोडे, सौ.पुष्पा भोगेकर, सौ.सविता आवारी, सौ.सुरेखा ठेंगळे, सौ.मीनाक्षी मोहिते, सौ. प्रगती घोटेकर, पुरुषोत्तम बुटे, मनिष बतरा, गोपी पुरावार, प्रकाश कऱ्हाड, विलास बोबडे, मंगल बोबडे, भगवान मोहिते, जगन जुनगरी, पंकज बल्की यासह शेकडो शिवसेना युवासेना तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. 

शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय भवानी जय शिवाजी, या घोषणांनी परिसर दणाणून सोंडला. शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन सुरू होताच नागरिकही आंदोलनात सहभागी झाले. शिवसेनेच्या रणरागिणींनी बससमोर जोरदार घोषणाबाजी करीत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
सौ. देरकरही उतरल्या चक्काजाम आंदोलनात
बस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी वणीमध्ये बस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर यांच्या पत्नी किरणताई देरकर यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी शहरातील बस स्थानकाच्या समोर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली,तर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
युवासैनिक बसच्या टपावर चढले
शिवसेनेने भाडेवाढीच्या विरोधात चक्काजाम पुकारताच वणी बसस्थानकाच्या गेटवर शिवसैनिक जमा झाले. चक्काजाम आंदोलन सुरू होताच युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, व त्यांचे कार्यकर्ते हे थेट बसच्या टपावर चढले. शिवसेनेचा ध्वज फडकावत भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, परिवहन मंत्री हाय, हाय, शिवसेना जिंदाबाद या घोषणा देत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनंतर पोलिसांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थलांतर करण्यात आले.
एस टी भाडेवाढ विरोधात शिवसेना आक्रमक, वणीत चक्का जाम आंदोलन एस टी भाडेवाढ विरोधात शिवसेना आक्रमक, वणीत  चक्का जाम आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 29, 2025 Rating: 5
Powered by Blogger.