सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव व तालुक्यातील अवैध दारू, मटका, जुगार, गोवंश तस्करी, सुगंधित गुटखा विक्री बंद करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना करण्यात आली आहे. या अगोदर सुद्धा मागणी होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परत भारतीय जनता पार्टीने सर्वानुमते ठराव घेतला आणि मारेगाव सह तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय सर्रास चालूच आहेत. ते तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
याबाबत ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे.नमूद सर्व अवैध व्यवसाय बंद झाले नाही तर आंदोलन करू असे भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
निवेदनावर भारतीय जनता पार्टी चे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, प्रशांत नांदे, विनीत जयस्वाल, दत्तू लाडसे, चंद्रकांत धोबे, निखिल मेहता, शोभाताई नक्षणे, मालाताई गौरकार, डोमाजी भादिकर, व तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागणी : अवैध धंदे बंद करा,भाजपा कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 31, 2025
Rating: