अखेर ठाणेदार अनिल बेहरानी यांची बदली,तर गोपाल उंबरकर वणीचे नवे ठाणेदार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात वजनदार 'पोलीस ठाणे' म्हणून ओळखले जाणाऱ्या वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल बेहराणी यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी पुसद ग्रामीण चे ठाणेदार गोपाल सुधाकर उंबरकर यांची नियुक्ती झाली आहे. ते आज पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. 

मागील काही महिन्यात वणी सह तालुक्यात कायदा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता. अवैध व्यवसाय तसेच वणी शहरात विविध गुन्ह्यात वाढ झाली होती, याबाबत श्री रामनवमी उत्सव समितीने आवाज उठवत जण मोहीम, व आंदोलन केले होते. वणी प्रशासनाला हादरविणारी घटना शहरात घडली होती. गोमास व त्यांचे शीर उघड्यावर आढळून आले होते.तर शेकडो जनावरांची हाडे कत्तलखाण्यात सापडली,त्यामुळे वणी शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर जनक्षोभ उसळून येथील ठाण्यावर माजी आमदार बोदकुरवार व हिंदू संघटना आक्रमक झाली होती. गोहत्या या प्रकरणात हलगर्जीपणा भोवल्यानचें अधीक्षकांनी बदली केली असावी अशी चर्चा आहे.

 मात्र, प्रशासकीय कारणास्तव जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी हा आदेश जारी केला आणि पुसद ग्रामीण चे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, यांच्याकडे वणी ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे वणी पोलीस स्टेशनचं वजन ठाणेदार गोपाल उंबरकर कसे पेलतात हे पाहणं औस्तुक्याचे ठरणार आहे.
अखेर ठाणेदार अनिल बेहरानी यांची बदली,तर गोपाल उंबरकर वणीचे नवे ठाणेदार अखेर ठाणेदार अनिल बेहरानी यांची बदली,तर गोपाल उंबरकर वणीचे नवे ठाणेदार Reviewed by सह्याद्री चौफेर on January 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.