सह्याद्री चौफेर : विनोद माहुरे
राळेगाव : विज मिटर बसविण्यासाठी शासकीय शुल्क व्यतिरिक्त पाच हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळच्या पथकाने आज 30 जानेवारी रोजी राळेगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात केली.
जगदीश श्रीराम ढुमणे (45) पद सहाय्यक अभियंता, वर्ग 2. नेमणुक उप-कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत उप-विभाग राळेगांव असे लाच घेतांना पकडलेल्या अधिका-यांचे नाव आहे. तक्रारदारांनी दि. 29 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ येथे जगदीश ढुमणे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत उप-विभाग राळेगांव यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती. त्यावरुन एसीबीच्या पथकाने 30 जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. ढुमणे यांनी घरात लाईनचे मिटर बसविण्याकरीता शासकीय शुल्क व्यतिरिक्त स्वतः करीता 5 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून सापळा रचुन सदर सहायक अभियंत्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कार्यवाही मारूती जगताप पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचिन्द्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे,अँटी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, पौना सचीन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे यांनी केली.
महावितरणचा सहायक अभियंता पाच हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2025
Rating: