वणी येथे वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : संस्कार भारती समिती, सागर झेप बहुद्देशीय संस्था, श्री जैताई देवस्थान,वणी द्वारा भारत माता पूजन उत्सवा निमित्याने नवीन पिढीचे भविष्य? या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विजयी स्पर्धेकाला 5 फेब्रुवारी ला होणाऱ्या व्याख्याना ला वणीकर जनते समोर वक्तृत्व करण्याची संधी देण्यात येणार आहे.
हि वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी वैचारिक व बौध्दिक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने 19 जानेवारी ला जैताई मंदिर येथे सकाळी 11 वाजता सुरु होणार असून वयोगट वर्ग 8 ते 12 गटातील विद्यार्थ्यांना 7 ते 10 मिनिटात वक्तृत्व करायचं आहेत.  
प्रथम बक्षीस 3000 व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस 2000 व सन्मानचिन्ह, 2 प्रोत्साहन बक्षीस रुपये 500 व सन्मानचिन्ह तसेच प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत वणी उपविभागीय क्षेत्रील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी येथे वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन वणी येथे वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2025 Rating: 5
Powered by Blogger.