वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना शासनाकडून ४ लाखाची मदत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील केगाव येथील रहीवासी मेघा गणपत पानघाटे यांच्यावर दिनांक २७/१२/२४ रोजी सायंकाळी अदांजे ६ वाजताचे दरम्यान, नैसर्गिक विज पडून मृत पावलेल्या होत्या. त्यांच्या वारसांना शासनाची ४ लाखाची तत्काळ मदत आमदार संजय देरकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय मारेगाव येथे देण्यात आली आहे.

मेघा गणपत पानघाटे ह्या शेतातून घरी येत असताना त्यांचे अंगावर वीज पडली व त्या जागीच मृत पावल्या होत्या. ही नैसर्गिक घटना असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने तत्काळ दखल घेऊन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते मृत मेघा पानघाटे यांचे पती गणपत पानघाटे यांचे खात्यात थेट ४ लाख जमा झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर नायब तहसीलदार रामगुंडे, मधुकर वरपटकर, अजय कवरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना शासनाकडून ४ लाखाची मदत वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना शासनाकडून ४ लाखाची मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2025 Rating: 5
Powered by Blogger.