वणी आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना, जानेवारी-2025 साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : दि.11-1-2025 रोज शनिवारला ठीक 11 वाजता वणी आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना, जानेवारी-2025 कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक बनसोड आगार व्यवस्थापक मागदर्शन करताना उपस्थित कर्मचाऱ्यांना रा.प. चे रस्ता सुरक्षा विषयी नियम समजावून वाहने सुरक्षित चालविण्यास सांगितले. तर कार्यक्रमाचे उदघाटक अनिल बेहराणी साहेब (ठाणेदार पोलिस स्टेशन, वणी) यांनी उद्‌घाटकीय भाषणात रस्ता सुरकक्षेकरिता विविध उदाहरणे व नियम समजावून मार्गदशन केले
तसेच प्रमुख पाहुणे सुमेध टिपले (विभागीय वाहतूक अधिकारी व पालक अधिकारी) यांनी रा.प. चे नियम कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले. सीता वाघमारे मॅडम (प्रभारी वाहतूक शाखा, वणी) यांनी वाहतुकीचा नियम पालन करावे असे, मार्गदशन केले. श्री. सुधाकर काळे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी सुद्धा रस्त्यावर वाहन चालवताना सुरक्षा बाळगावी, तर लता मुकेवार मॅडम (सहाय्यक वाहतूक अधिकारी) यांनी चालक व वाहक कर्मचाऱ्यांना रा.प. नियमाचे पालन करून कामगिरी करण्यास सूचना दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरि आसूटकर यांनी केले व आभार प्रदर्शन शुभम सुरपाम यांनी मानले. कार्यमाला सर्व रा.प. कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन व मार्गदर्शन ऐकुन सहकार्य केले. अशा प्रकारे रा.प. वणी आगार इथे राष्ट्रीय सुरक्षा महिना,जानेवारी 2025 कार्यक्रम साजरा केला.
वणी आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना, जानेवारी-2025 साजरा वणी आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना, जानेवारी-2025 साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on January 15, 2025 Rating: 5
Powered by Blogger.