सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
प्रवीण सुदाम ताजणे (अंदाजे वय 32) रा. हिवरा,असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. प्रवीण हा शेती कसून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. आज दि. १४/०१/२०२५ रोज मंगळवारला सायकळी ६.३० वा.गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे कळाले नसून मृतकाच्या पाठीमागे आई वडील, पत्नी व तीन वर्षाची चिमुकली मुलगी असा आप्त परिवार आहे. पंधरा दिवसा अगोदर बहिणी चा पती मरण पावला असे समजते.
सदर घटनेची माहिती पोलिस पाटील राजू गाडगे यांनी मारेगाव पोलिसांना दिली. मात्र, वृत्त लिहेपर्यंत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल व्हायची होती.
गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 14, 2025
Rating: