भाकपचा (CPI) मारेगाव येथे आढावा मेळावा आयोजित

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : नुकतेच वणी विधानसभेची निवडणूक आटोपली या निवडणुकीत भाकपचे काॅ.अनिल हेपट उमेदवार ‌होते.यामध्ये अनिल हेपट‌ पाचव्या स्थानी‌ राहीले.पक्षाची प्रचार यंत्रणा सर्वोत्कृष्ठ राहीली,350 गावात तिन‌ फेऱ्या झाल्यात,घराघरात जाहीरनामा,बॅलेट,बिल्ले पोहचले,प्रेस मध्ये दखलपात्र राहीले.परंतु विजयापासून आपण दुर राहीलो याची कारणमिमांसा शोधण्यासाठी,आत्मचिंतन करण्यासाठी 13 डिसें.2024 रोजी स.11 वाजता मारेगाव येथील भाई नथ्थु पाटील किन्हेकार सभागृहत प्रचारयंत्रणेत काम करणारे कार्यकर्ते,बुथप्रमुख,शाखा‌ पदाधिकारी,जिल्हा कौंसिल सदस्य व समर्थकांचा भव्य आढावा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कॉन्सिलर काॅ.तुकाराम भस्मे (अमरावती),उमेदवार काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे हे मार्गदर्शन‌ करणार आहेत.सोबतच बुथप्रमुखही आपले अनुभव,मनोगत व्यक्त करणार आहेत. यासोबतच मेळाव्यात पक्षाचे शताब्दीवर्षानिमीत्य आगामी कार्यक्रम,सभासद नोंदणी,शाखा परिषदा,आगामी जि.प.पं.स.न.प.निवडणुका लढविण्याबाबत तसेच अन्य विषयावर चर्चा होणार आहे.

भाकपचा (CPI) मारेगाव येथे आढावा मेळावा आयोजित भाकपचा (CPI) मारेगाव येथे आढावा मेळावा आयोजित Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.