टॉप बातम्या

सामाजिक कार्यकर्ते उमर शरीफ यांचा आमरण उपोषणाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : येथील कब्रस्तान मध्ये पाणी नसल्याने आणि पाण्या अभावी मुस्लिम बांधवाना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने कब्रस्तानला पाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नळ कनेक्शन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमर शरीर यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना अवगत करीत जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे केली.

निवेदनात नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की यांचेकडे विचारणा केली असता आम्ही तशा ठराव घेऊन कब्रस्तानमध्ये नळ कनेक्शन देण्याच्या सूचना केल्या आहेत अस म्हटलं. तर या बाबत मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांचेकडे मागणी केली असता "कब्रस्तानमध्ये आमदार निधीमधून विकास कामे होत आहे. त्यात ट्यूबवेलचा सुद्धा समावेश आहे. आता सामान्य फंडात पैसे नाही. तुम्हाला काय करायचे ते करा मी नळ कनेक्शन देणार नाही." असे उर्मट उत्तर दिले,असेही निवेदनात नमूद आहे. 
नियमाला धरून नळाची मागणी करुनही जाणीव पूर्वक नळ कनेक्शन देत नाही. हा मुस्लिम धर्मावर अन्याय होत असल्याची भावना शहरांतील मुस्लिम कुटुंबीयात होत आहे. मुस्लिम धर्मा सोबत येथील नगरपंचायत विभाग दूजाभाव करीत आहे. असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसा मध्ये कनेक्शन न दिल्यास, वरील मागणी पूर्ण होई पर्यंत नगर पंचायत मारेगाव कार्यालयासमोर उमर शरीफ हे आमरण उपोषण करणार आहे, अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. परिणामी नगर पंचायत काय निर्णय घेतात की आणखी दुर्लक्ष करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post