सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : बीड जिल्ह्यातील मस्साजोग,क्रेज येथील माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची (ता.9 डिसें.) रोजी दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी राज्यात रान उठलं असून त्याचे लोन विदर्भासह मारेगावात सुद्धा पहायला मिळत आहे. आज शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना मारेगाव तालुका शाखेच्या वतीने सदर घटनेचा जाहीर निषेध करत आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली.
सदर घटनेचा मास्टर माईंड शोधावा, प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करावी, सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील देण्यात यावे, व या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट बसवून आरोपीना फाशी शिक्षा द्यावी, या प्रमुख मागण्या संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संदीप कारेकर, प्रशांत भंडारी, राहुल आत्राम, रामचंद्र जवादे, निलिमा थेरे, डिमन टोंगे, सुरेश लांडे, प्रेमीला आदेवार, विमल उरकुडे, इंदिरा पिदूरकर, प्रवीण नान्हे, नीता खंडाळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माजी सरपंच देशमुख यांच्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 12, 2024
Rating: