स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची धडक कारवाई: 1 कोटी, 34 लाख, 51 हजार, 800 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा व वाहन जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर पेट्रोलिंग केली जात आहे. अशातच पेट्रोलिंग वर असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त सूत्राकडून गुप्त माहिती मिळाली की, पांढरकवडा मार्गाने प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने येत असलेल्या वाहनाची झडती घेऊन वाहनासह 1 कोटी 34 लाख 51 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अख्तरभाई अहमदमिया शेख (वय 47 रा. बहियेल, ता. देहगम जि.गांधीनगर, (राज्य गुजरात) असे त्याचे नाव आहे.
अवैद्य धंद्याविरोधात जिल्हा पोलिसांनी माहिम सुरू केली आहे. या अंतर्गत माहिती मिळवताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास काही काही व्यक्ती लपून-छपून नवनवीन मार्गाने अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी गुटख्याची साठवणूक व वाहतूक करीत असल्याचे कळाले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पिंपळखुटी आर टी ओ चेक पोस्ट येथे वाहनांची चेकिंग करत असताना वाहन क्र.जिजे 27, टी एफ -0582 हे वाहन आले असता चालकाची विचारपूस केली व सदर वाहनाची तपासणी केली असता पांढरकवडा हद्दी मधून वाहतूक करण्यात आलेला 1 कोटी 51 लाख 34 हजार 800 रूपयाचा सुगंधित गुटखा, एक अशोक लेल्यांड वाहन सह जप्त केला. आरोपीस ताब्यात घेउन पो.स्टे. पांढरकवडा येथे अप.क्र.1242/2024 व कलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमने 2011, चे कलम-26(3), सहवाचन कलम 30 (2) (A) चे उल्लंघन अन्न सुरक्षा व मानद कायदा कलम-59 अंतर्गत, भा.न्या.स. कलम- 223, विषारी अन्नपदार्थाची वाहतूक/विक्री बी.एन.एस. कलम 274, 275 व 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ए पी आय अजयकुमार वाढवे स्थानिक गुन्हे शाखा, हे करीत आहेत.
सदर कार्यवाही कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, रामेशेवर वैजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पांढरकवडा, ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात ए पी आय अजयकुमार वाढवे, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत, एल सी बी पथक यवतमाळ यांनी पार पाडली.
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची धडक कारवाई: 1 कोटी, 34 लाख, 51 हजार, 800 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा व वाहन जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची धडक कारवाई: 1 कोटी, 34 लाख, 51 हजार, 800 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा व वाहन जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.