महापरिनिर्वाण दिनानिमित्त निःशुल्क पुस्तके वाटप उपक्रम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मार्डी : बौध्द स्मारक समिती, चिंचमंडळ द्वारा विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन पुस्तके निःशुल्क वाटप करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वर देठे, सचिव राजेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्धवंदना घेवून अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब एका संदेशात म्हणतात "वाचालं... तर वाचालं..!" बाबासाहेबांच्या या संदेशाचे अनुकरण करण्यास समिती द्वारे महापरिनिर्वाण दिनी खरी आदरांजली देण्याकरीता पुस्तक वाटपाचा उपक्रम राबवून 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ व 'भारतीय संविधानचे' आवृत्ती पुस्तक ज्ञानेश्वर देठे तथा राजेश कांबळे यांच्या शुभहस्ते उपस्थित नागरिकांना निःशुल्क वितरित करण्यात आले.

सायं. ६:३० वा. कँडल मार्च गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त निःशुल्क पुस्तके वाटप उपक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त निःशुल्क पुस्तके वाटप उपक्रम Reviewed by सह्याद्री चौफेर on December 13, 2024 Rating: 5
Powered by Blogger.