सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : परभणी शहरात घडलेल्या घटनेचा वणी मध्ये यंग इंडिया ऑफ आंबेडकरराईट मूव्हमेंट च्यावतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकरवी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
या प्रकरणात विटंबना करणाऱ्यावर पोलिस प्रशासनाने ताबडतोब आरोपी वं त्यामागील सूत्रधाराला तात्काळ शोध घेऊन अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी. व यापुढे अशा जाणीवपूर्वक समाजद्रोही, राष्ट्रद्रोही कृती घडणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी,असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर रजत सातपुते, काजल वाळके, आकाश बोरकर, प्रेम अडकीने, स्वेता माहुरे, इस्माईल खान आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
परभणी घटनेचा वणीमध्ये निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2024
Rating: