सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : महादापेठ येथे संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा व गीता जयंती निमित्त हपभ भागवताचार्य श्री.जाधव महाराज यांचे दोन (ता.11 ते 12) डिसें. दिवशीय कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व गीता ग्रंथ चे पूजन करण्यात आले. अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गावातील भाविक भक्तांनी संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा व गीता जयंती आनंदोत्सव साजरा केला.
कार्यक्रमात भजन, दिंडी अशा विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांनी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले असून कार्यक्रमाची सांगता शेवटी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने झाली.
महादापेठ येथे संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा व ‘गीता जयंती’ संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 14, 2024
Rating: