गाव तिथे भाकपच्या शाखा स्थापून येणाऱ्या जि.प.पं.स. व न.प.च्या निवडणुका स्वबळावर लढविणार-काॅ.अनिल हेपट
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : नुकतेच आटोपलेल्या वणी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी,पक्षाची कामगिरी व आत्मचिंतन करण्यासाठी 13 डिसें.रोजी मारेगाव येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मेळावा संपन्न झाला.मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जेष्टनेते गुलाबराव उमरतकर (बाभुळगाव) होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन तुकाराम भस्मे (अमरावती), उमेदवार अनिल हेपट होते, अतिथी म्हणुन हिम्मतराव पाटमासे (यवतमाळ), अॅड.संजय मडावी (झरी), वासुदेव गोहणे (जुनोनी), गणेश कळसकर, विलास आवारी, कैलास आत्राम, विलास निखाडे(मारेगाव), प्रविण आडे (राळेगाव), भास्कर सपाट (सराटी), मोरेश्वर कुंटलवार (येनक), सतिश पचारे (कोसारा), ऋषी उलमाले(वेळाबाई), प्रा.धनंजय आंबटकर(वणी) हे उपस्थित होते.
मेळाव्यात निवडणुकीवर चर्चा करून वणी येथे जानेवारी 2025 चे शेवटी राज्यव्यापी कापूस उत्पादक परिषद घेण्याचे ठरले,26 डिसें.2024 ते 26 डिसें.2025 हे वर्षभर भाकपचे शताब्दी वर्ष म्हणुन साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. काॅ.अनिल हेपट यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगीतले की, आपला निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपण खचुन न जाता नव्या उमेदीने मतदारसंघातील सर्व गावात पक्षाची शाखा बांधणी करणार,सभासद नोंदणी वाढविणार आणि येणारया जि.प.पं.स.व न.प.च्या सर्व निवडणुका भाकप स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.
मेळाव्याला मतदारसंघातील कार्यकर्ते,बुथप्रमुख,निवडणुकीत ईनकमींग झालेले सर्व नविन सभासद,जिल्हा कौंसिल सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.मेळाव्याची प्रस्तावना अनिल घाटे यांनी,संचालन बंडु गोलर यांनी तर आभार प्रदर्शन मारुती काळे यांनी मानले.
गाव तिथे भाकपच्या शाखा स्थापून येणाऱ्या जि.प.पं.स. व न.प.च्या निवडणुका स्वबळावर लढविणार-काॅ.अनिल हेपट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 14, 2024
Rating: