अध्यक्षा सौं. इंदिरा बोन्दरे यांच्या लढ्याला यश : आमदार संजय देरकर यांनी आमरण उपोषणाची घेतली दखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी : तालुक्यातील प्रामुख्याने रायपूर पोड सहित इतरही पोडावर मूलभूत सुविधा नसल्याने बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी (१२ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजता पासून गावच्या विकासासाठी चक्क पाण्याच्या टॉकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले असता आमदार संजय देरकर यांना कळताच त्यांनी तासाभऱ्यात सर्व अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी पाचारण करून महिला आंदोलकांच्या मागण्या मान्य करून सदर आंदोलनाची सांगता करण्यात आली. 

सौ. इंदिरा बोंदरे यांनी विभागीय आयुक्त, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांची प्रत्यक्ष भेट घेवून सादर केलेल्या निवेदनाततून आरोप असे की, भारतीय संविधानाप्रमाणे राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समुहकरिता मूलभूत सुविधा पुरविणे प्रामुख्याने घरकुल,आदिवासी कोलाम पोडावर पोहच रस्ते, स्वतंत्र शौचालय, विद्युत पुरवठा, मोफत शिक्षण, ह्या मूलभूत सुविधा पुरविणे सरकारची जबाबदारी असताना यवतमाळ जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी बहुल वस्ती असणाऱ्या झरी जामणी तालुक्यातील रायपूर कोलाम पोड सहित इतरही कोलाम पोडावर कोलाम समाजाच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करुन राज्यात चौदावी विधानसभा विस्थापित होवून पंधरावी विधानसभा अस्तित्वात आलेली असताना सुद्धा आदिवासी कोलाम समुहाकडे राज्यकर्ते तथा लोकप्रतिनिधी यांनी अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नूतन सरकारच लक्ष वेधण्यासाठी संविधानात्मक मार्गाने रायपूर कोलाम पोडावरील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण करणार असल्याबाबत संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लेखी स्वरूपात निवेदन सादर केले होते. 

प्रदेश अध्यक्षा सौ.इंदिरा बोंदरे यांनी गुरुवारी पाटणबोरी ते मुकुटबन मुख्य रस्त्यावर रायपूर फाटा ते रायपूर कोलाम पोड पर्यंत डांबरीकरण करण्यात यावे, रायपूर कोलाम पोडवरील निधन झालेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र दफन भूमी करीता जमीन आरक्षित करुन देण्यात यावी, तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी गोंड प्रधान कोलाम समाजाच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी देण्यात यावे, आदिवासी महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा बिन व्याजी कर्ज देण्यात यावे, ह्या मागण्यासाठी रायपूर कोलाम पोडावरील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. आमदार संजय दरेकर यांनी काल तारीख १३ डिसेंबर रोजी रायपूर जावून सर्व अधिकाऱ्यांना अवघत केले व आंदोलनकर्त्याच्या समस्या दोन महिन्यात सोडविण्याचे आश्वासन देवून आंदोलनाची सांगता केली. 

यावेळी आमदार संजय देरकर यांच्या सह महाविकास आघाडी चे पदाधिकारी, सरपंच संघटनेचे, तहसिलदार, सा. बां. विभाग ,पं.स. अधिकारी, तलाठी, भूमिअभिलेख, आदिवासी प्रकल्प विभाग, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        
अध्यक्षा सौं. इंदिरा बोन्दरे यांच्या लढ्याला यश : आमदार संजय देरकर यांनी आमरण उपोषणाची घेतली दखल अध्यक्षा सौं. इंदिरा बोन्दरे यांच्या लढ्याला यश : आमदार संजय देरकर यांनी आमरण उपोषणाची घेतली दखल Reviewed by सह्याद्री चौफेर on December 14, 2024 Rating: 5
Powered by Blogger.