सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : अवैध वाळू वाहतूक करत असलेला ट्रक महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास सावंगी शिवारातून पकडला आहे. सदरहू कारवाईने वाळू माफियांना चाप बसवला आहे.
उपविभागीय अधिकारी, वणी यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/12/2024, गुरुवार रोजी सकाळी ठिक 8.30 वाजताचे दरम्यान मौजे सावंगी शिवारातून अंदाजे 13 ब्रास अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असतांना मोठा ट्रक क्र. (एम एच 40,सी टी 0776) हे वाहन स्वतः तहसीलदार यांनी पकडून तहसील कार्यालय मारेगांव येथे जमा करण्यात आलेला आहे.
त्यावेळी स्वतः तहसीलदार उत्तम निलावाड मारेगांव, तलाठी वानखेडे, शिंगणे, गुणवंत, कुडमेथे, विकास मडावी, कोतवाल दिलीप पचारे इत्यादी उपस्थित होते. या धडक कारवाई ने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
तहसीलदारांची कारवाई;अवैध वाहतूक करणारा वाळूचा ट्रक पकडला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 19, 2024
Rating: