सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, हमीभाव मिळावा,ही शेतकऱ्यांची रास्त मागणी अजूनही पूर्ण होत नाही,शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव अधिक मिळावा यावा याकरिता सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनात वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चक्क शेतातील कपासीचे झाड दाखवून शेतकऱ्यांना न्याय मागितल्याने मतदार संघात आ. देरकरांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.
राज्याचे हिवाळी नागपूर येथे अधिवेशन सुरु असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेरल्या जात आहे. अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पायरीवर महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव अधिक पन्नास टक्के नफा घोषित करण्यात यावा, याकरिता सरकार च्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून कष्ट करणाऱ्या बळीराजाला पहिल्यांदा पेरलेले उगवेल का याची चिंता अन् जे उगवले ते कवडीमोलाने विकले गेल्याची वेदना घेऊनच जगावे लागते यंदा तुलनेने पाऊस बरा झाला असला तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना हमी भाव अधिक ५० टक्के नफा देवू म्हणून आश्वासन देणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. विरोधक सातत्याने कर्जमाफीची मागणी करीत आहेत. शेतकऱ्यांचा लागत खर्च देखील निघत नसल्याने मुद्दलमध्ये तोटा निर्माण होत आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मूल्य सरकार ठरवू शकत नाही आहे. हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आखून शेती हा व्यवसाय नष्ट करू पाहत आहे.
![]() |
आ. संजय देरकर वणी विधानसभा क्षेत्र |
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे गटनेते विद्यमान आमदार यांनी विधानभवनाच्या पायरीवर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्ज माफी झालीच पाहिजेत, शेतकऱ्याना शेती पंपासाठी पूर्णवेळ विज मिळालीच पाहिजेत, यासाठी सरकारचे लक्ष वेधत आंदोलन केले. दरम्यान,विधानसभेतील सर्व महाविकास आघाडीचे आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. यामध्ये वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर ह्यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 19, 2024
Rating: