पिकअपची ट्रकला धडक : पिकअप चालक गंभीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : घुगुसहून वणीकडे येणाऱ्या पीकअपची नियंत्रण सुटून वागदराजवळ एका उभ्या वाहणाला धडक दिली. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहेत. ही घटना आज १८ डिसेंबर ला संध्याकाळी ७.३० वाजता घुग्गस वणी महामार्गावर वागदरा जवळ घडली.
१८ डिसेंबर ला संध्याकाळी साडेसात वाजता च्या सुमारास पीकअप क्रमांक एम एच ३१ एफ सी ५६२८ व एमएच ४३ ए वी २३६५ यांचात धडक झाली. या घटनेत पिकअप चालक करण चंदू पुंड (२६), रा. पळसोनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागरिकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 
या अपघातात पिकअप चा दर्शनीभाग चेंदामेंदा झाला आहे. सदरहू घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचून अपघात स्थळाचा पंचनामा केला व घटनेतील अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

पिकअपची ट्रकला धडक : पिकअप चालक गंभीर पिकअपची ट्रकला धडक : पिकअप चालक गंभीर Reviewed by सह्याद्री चौफेर on December 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.